शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलफेजमुळे पाण्याच्या टाक्या झाल्या ‘ड्राय’

By admin | Updated: June 8, 2014 23:47 IST

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता

संजय वरघने - चिमूरशहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता दहा ते पंधरा तास थ्री फेज वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र सध्या चिमूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने तालुक्यातील खंडसंगी, भिसी, शंकरपूर, नेरी, मासळ, मदनापूर, चिमूर, टेकेपार तथा इतरही गावातील पाण्याच्या टाक्या पाण्याविना ड्राय झाल्या आहेत. तर अनेक ग्रामीण भागात पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा शोभेच्या वस्तु बनल्या आहेत. अनेक गावात तांत्रिक अडचणीमुळे नळ योजना थंडबस्त्यात पडल्या आहेत. चिमूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून २६५ गावांचा समावेश आहे. ८२५ हातपंप सुरळीत सुरु असून १८ हातपंप नव्याने मंजूर आहे.  ६ नळ योजना दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे नसल्यामुळे प्रत्येक गावात हातपंपाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. फक्त तांत्रिक अडचण सिंगलफेज व विद्युत पुरवठा खंडीत या समस्येमुळे ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. तालुक्यातील परिसरात बर्‍याच भागात पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. फ्लोराईडमुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत होता. डायरीया या आजाराचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांनी निवासी राहून या आजाराबाबत सेवा द्यावी.शासनाने ५६0 हातपंपाची दुरुस्ती केल्यामुळे व काही बिघाड आलेल्या हातपंपालाही दुरुस्ती सुरु असल्यामुळे तालुक्यात कोणत्याच गावाला पाण्याचा फटका बसला नाही. शहरासह ग्रामीण जनतेलाही स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ वर्षाआधी नळ योजना सुरु केली. ही नळ योजना पूर्णत: विद्युतीकरणावर अवलंबून आहे. मात्र सध्या चिमूर वीज वितरण उपविभागाद्वारे मागील अनेक दिवसांपासून भारनियमनाचे नावाखाली सिंगलफेज विद्युत पुरवठा १८ तास करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा तास थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. तसेच भिसी परिसरात दोन दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत असून शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे इथेही नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. चिमूर येथील ठक्कर वॉर्ड येथील नागरिकांना बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.नळ योजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पुन्हा विहिरीचे किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या आधार घ्यावा लागत आहे. खडसंगी परिसरात चंद्रपूर जिल्ह्यात फ्लोराईडच्या प्रमाणापेक्षाजास्त आहे. या फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या सबबीखाली शासनाने या गावांना नळ योजना दिली, त्या उद्देशाला वीज वितरण कंपनीच्या सिंगलफेजमुळे हरताळ फासला जात आहे.