शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले

By admin | Updated: July 5, 2017 01:08 IST

विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते.

दुरुस्ती करण्याची मागणी : वाहनचालकांची कसरतलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील वनोजा-कळमना, विरुर आवारपूर, कवटाळा ते भोयेगाव हे मार्ग पहिल्या पावसानेच पूर्णपणे उखडले आहेत. वनोजा आणि कळमना हा मार्ग सतत चालू असतो. लोकांना वणी, कोरपना, वनसडी या बाजारपेठ पडतात. परंतु, या बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना वनोजा कळमाना या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडलेला असल्याने आपला जीव मूठीत घेऊन प्रवास करावा लागतो. थोडासा जरी पाणी आली तर रस्तावरील सर्व खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागते. तसेच विरूर ते आवाळपूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखळले आहे. पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले असल्यामुळे अनेकजण या मार्गाचा वापर करायचे. मात्र प्रशासनाकडून रस्ते उखडल्यानंतर डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर मार्ग पूर्णपणे उखडला आहे. तसेच कवटाळा भोयेगाव या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे पाणी आली ते साचून राहते त्यामुळे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या मार्गावरुन गडचांदूर, लखमापूर, तळोधी, कवठाळा, धूनकी, भोयगाव, कोरपना, वनसडी, नारंडा, अंतरगाव, कढोली, वनोज, कोडसी, नांदगाव, धानोरा, उपरवाही परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येजा करतात. रसत्याच्या दुरवस्थेमुळे मागील वर्षी भोयगाव येथील शालेय विद्यार्थ्यांचा ओव्हरलोड कॅप्सूलमध्ये नाहक बळी गेला. तरीसुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.