शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आदेशामुळे आचारसंहितेतून दिलासा

By admin | Updated: October 21, 2016 01:04 IST

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती.

आचारसंहिता केवळ निवडणूक क्षेत्रातच: आयोगाचे नव्याने आदेशचंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. मात्र १९ आॅक्टोंबर रोजी नव्याने आलेल्या आदेशानुसार आता आचारसंहितेचा प्रभाव केवळ निवडणूक क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार आहे. या नव्या आदेशामुळे पुढारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या निर्देशानुसार ज्या नगर परिषद क्षेत्रात निवडणूक आहे, त्याच क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार आहे. त्या परिसरातील क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही. परंतु नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर काम करताना शेजारच्या नगर परिषद क्षेत्रातील मतदारावर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर लागून असलेल्या ग्रामीण भागात सरकारला नवीन रस्ते, जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना इत्यादी कामे करता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसह एक नवनिर्मीत नगर पंचायतीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. इतर निवडणूकांप्रमाणेच या निवडणूकीतही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिल्या. यंत्रणांनी आचारसंहिताभंगची घटना कुठे घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक सिरसे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी विकास हरखंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राजूरा, मूल, बल्लारपूर व वरोरा या चार नगरपरिषदेची व नवनिर्मिती नगर पंचायत सिंदेवाहीची निवडणूक जाहीर झाली असून २७ नोव्हेंबरला मतदान, तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. संबंधित नगरपरिषद क्षेत्रात १७ आॅक्टोंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे पालन योग्यपणे व्हावे, यासाठी ही बैठक घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)