शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मायलेकींच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

By admin | Updated: May 30, 2015 01:38 IST

मुुलीच्या सासरी भेट घेण्यासाठी आलेली मुलीची आई पुष्पा चित्तलवार (५०) आणि मुलगी लक्ष्मी येमुलवार (२८) या दोघीही भिवापूर येथील ...

विषबाधा प्रकरण : घटनास्थळावर आढळले सरबताचे तीन ग्लासबाबुपेठ (चंद्रपूर) : मुुलीच्या सासरी भेट घेण्यासाठी आलेली मुलीची आई पुष्पा चित्तलवार (५०) आणि मुलगी लक्ष्मी येमुलवार (२८) या दोघीही भिवापूर येथील लक्ष्मीच्या राहते घरी बुधावारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता दोघींचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून घटनास्थळवरुन मिळालेल्या सरबतच्या तीन ग्लॉसमुळे हे तिसरे ग्लास कुणाचे, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, याचे गूढ अद्यापही कायमच आहे.मायलेकींचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. मात्र पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. ग्लॉसमधील शरबताचे नमुने तपासणीकरिीाा नागपूर लॅबमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालपेठ रहिवासी पुष्पा बुधवारी आपल्या मुलीच्या भेटीकरिता तिच्या भिवापूर येथील घरी आली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास मुलगी आणि आई दोघांनाही विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर सरबतचे तीन ग्लास मिळाले. त्यातील दोन ग्लास खाली तर एक ग्लास सरबतने भरलेला होता. त्यासोबतच सरबत बनविण्यात आलेला गंजही पोलिसांनी ताब्यात घेतला असून सरबताचे नमुने तपासणीकरिता नागपूरला पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालही अद्याप अप्राप्त असल्याने दोन्ही अहवाल आल्यावर घटनेचा उलगडा होणार आहे. घटनास्थळावर मिळालेला तिसरा ग्लास कुणाचा होता आणि तो शरबत न पिताच निघून का गेला असावा, या प्रश्नाचे उत्तरही शोधण्यात पोलीस प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)