शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ...

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शोधण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. त्यामुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मृत्यूमागील नेमक्या कारणांचाही शोध घेणे सुरू केले आहे.

डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. यासाठी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहावी लागत आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीसही अनभिज्ञ आहेत. तो अहवाल जलदगतीने प्राप्त व्हावा म्हणून स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रयोगशाळा प्रमुखांना पत्र दिले आहे.

डाॅ. शीतल या मानसिक तणावात होत्या, ही बाब तपासात पुढे आली असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. या मानसिक तणावाचे काय कारण होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आनंदनातील काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. मृत्यूला कौटुंबिक कलह कारणीभूत आहे का, या दिशेनेही शोध सुरू आहे.

गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस

पाेलीस सूत्रानुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे थेट कौटुंबिक कलहाचे कारण जोडता येत नाही. त्यांच्या मृत्यूच्या आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत आमटे कुटुंबीय डाॅ. शीतल यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे आधी मृत्यूच्या कारणांचा उलगडा केला जाईल, त्यानंतर घटनाक्रम शोधला जाईल. गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस केली जाईल.

करजगी कुटुंबीयांच्या बयाणांबाबत गोपनीयता

घटनेच्या दिवशी पती गौतम करजगी हे घरी आले तेव्हा त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराची कडी आतून लावलेली होती. गौतम यांनी दार उघडल्यावर डाॅ. शीतल खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना आनंदवनमधील रुग्णवाहिकेतून थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनाक्रमाबाबत पोलिसांनी करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदविलेले आहेत. मात्र पोलिसांनी ते गोपनीय ठेवले आहेत.