शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

तळोधी परिसरात धानाची डबल फसल

By admin | Published: February 11, 2016 1:24 AM

धानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे.

परिस्थितीवर शेतकऱ्यांची मात : विहिरींमुळे झाली सिंचनाची सोयघनश्याम नवघडे नागभीडधानाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत, शेती करणे परवडत नाही. तरीही नागभीड तालुक्यातील सावरगाव, गिरगाव या परिसरात धानाची दुसरी फसल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. खरोखरच या शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करण्याजोगी ही बाब आहे. प्रादेशिकतेच्या दृष्टीने नागभीड तालुक्याचे दोन भाग केले जातात. एक नागभीड आणि दुसरा तळोधी. घोडाझरी तालावाच्या रुपाने तळोधी भागाला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने हा भाग तसा सुपीकच म्हणूनच संबोधल्या जाते. या भागात धानाचे उत्पादन नागभीड भागापेक्षा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. पण प्रत्येक गोष्टीच्या वाढलेल्या किंमती वातावरणामुळे धानाला सतावणारे विविध रोग आणि दिवसेंदिवस धानाचे घटत चाललेले भाव या विविध कारणांमुळे तळोधी भागातीलही शेतकरी त्रस्त झाले आहेत.असे असले तरी या सर्व संकटांवर मात करुन तळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा या परिसरात शेतकऱ्यांनी धानाची दुसरी फसल घेतली आहे. या दुसऱ्या फसलसाठी मागील महिन्यातच पऱ्ह्याची पेरणी केली. आता हे पऱ्हे रोवणी योग्य झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवातही केली आहे. सदर प्रतिनिधीने या भागास भेट दिली असता, सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात अनेक शेतात रोवणी सुरु असल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात सावरगाव येथे तर दुसऱ्या फसलचे प्रमाण अधिक असल्याचे एका शेतकऱ्यांने सांगितले. धान पिकास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी आणि विधन विहिरींची सोय उलब्ध केली आहे. या विहिरी अािण विंधन विहिरीच्या भरवश्यावरच हे शेतकरी धानाचे दुसरे पकी घेत आहेत. धानाला भाव जरी कमी असले तरी या दुसऱ्या हंगामाने त्यांच्या आर्थिक थैर्याला मदत होत आहे. ३५० ते ४०० एकरवर डब्बल फसलतळोधी भागातील सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरात जवळपास ३५० ते ४०० एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेतले जात आहे. या दुसऱ्या पिकामुळे त्या परिसरातील मजुरांना रोवणी आणि कापणीच्या रुपाने रोजगारही उपलब्ध झाला आहे.आमच्या कुटुंबात लहान मोठे ४० सदस्य आहेत. आमचे एकत्र कुटुंब असून शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आम्ही जवळपास ३५ एकरामध्ये धानाचे दुसरे पीक घेत आहोत. रिकामे बसण्यापेक्षा आम्हीशेतीत गुंतून राहतो. शेती सुद्धा चांगली राहते. आर्थिक फायदाही होतो. कुटुंबातील व्यक्तीही कामात व्यस्त राहतात.- गणपत ठिकरे, शेतकरी,सावरगावजिथे जिथे सिंचनाची सोय उपलब्ध आहे, तिथे तिथे हे उन्हाळी पीक घेतले जाते. सावरगाव, गिरगाव आणि वाढोणा परिसरा व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गावातही उन्हाळी लागवड केली जाते. धानासोबतच इतर पीकही शेतकऱ्यांनी घ्यावे.- आर. एन. पठाण, तालुका कृषी अधिकारी, नागभीड