ऊर्जानगर वसाहत व वस्ती मिळून एक ग्रामपंचायत आहे. यात प्रत्येकी तीन वार्ड आहेत. वस्तीतील वार्डात आठ तर वसाहतीतील वार्डात नऊ अशी ही एकूण १७ सदस्यीय ऊर्जानगर ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीत सोमवारी एक विशेष सभा आयोजित करून सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदाकरिता वस्तीतून राजू डोमकावळे तर वसाहतीतून मंजुषा येरगुडे यांनी नामांकन दाखल केले. वस्ती विरुद्ध वसाहत अशी लढत झाली. यात वसाहतीतील मंजुषा येरगुडे या नऊ मते घेऊन सरपंचपदी निवडून आल्या. राजू डोमकावळे यांना आठ मते मिळाली, तर उपसरपंच पदाची माळ ही वसाहतीतील अंकित चिकटे यांच्या गळ्यात पडली. ऊर्जानगर ग्रामपंचायतीचे अशी दोन्ही पदे वसाहत वासी यांनी काबीज केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}