शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

‘ति’च्यासाठी डॉक्टर अन् पोलीस ठरले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 5:39 PM

तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शुद्ध हरपली. ती चार ते पाच दिवस बेशुद्ध होती. तसेच जवळपास १३ दिवस रुग्णालयात भरती होती. तिच्याजवळ कुणी नसल्याने उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे तिचे नातेवाईक झाले.

ठळक मुद्दे१३ दिवसांच्या उपचारानंतर पोहोचली घरी

चंद्रपूर : वाटेत अपघात झाला. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे तिची शुद्ध हरपली. काहींनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. जवळ ना कुणी नातेवाईक ना मित्र. अशाही स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या चमूने योग्य उपचार करून तिला बरे केले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला अन् तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. अगदी चित्रपटात घडणारे कथानक चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतेच समोर आले. यातून डॉक्टरपोलिसांच्या माणुसकीचा परिचय सर्वांना झाला.

यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील अर्चना इंदरवाडे चंद्रपूरला आली असता १३ नोव्हेंबर रोजी पडोली मार्गावर तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शुद्ध हरपली. पाहणाऱ्यांनी तिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. तिच्याजवळ कुणी नातेवाईक नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तीन ते चार दिवसांनंतर ती शुद्धीवर आली. परंतु डोक्याला मार असल्याने ती पूर्णपणे बरी होईपर्यंत डॉक्टरांच्या चमूने तिच्यावर उपचार सुरूच ठेवले.

ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिची आस्थेने चौकशी केली. तिने आपले नाव अर्चना इंदरवाडे (रा. अकोला बाजार) असे सांगितले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनात समाजसेवा अधिकारी (वैद्यकीय) भास्कर झळके, समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे, हेमंत भोयर व त्यांच्या चमूने यवतमाळ येथील पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करुन तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यानंतर तिचा भाऊ रवींद्र कुंभेकार याला बोलवून तिला घरी पाठविण्यात आले. डॉक्टरांची ही माणुसकी बघून अर्चना व तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

डॉक्टरांचा चमू ठरले तिचे नातेवाईक

अर्चना चार ते पाच दिवस बेशुद्ध होती. तसेच जवळपास १३ दिवस रुग्णालयात भरती होती. तिच्याजवळ कुणी नसल्याने उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे तिचे नातेवाईक झाले. तिला काय हवे काय नको, वेळेवर जेवन व गोळ्या सुद्धा रुग्णालयातील कर्मचारी करीत होते. त्यामुळे अर्चनाला सुद्धा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा स्टॉप नातेवाईकच वाटू लागले होते.

टॅग्स :SocialसामाजिकHealthआरोग्यAccidentअपघातdoctorडॉक्टरPoliceपोलिस