दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास घाबरु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:37+5:30

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. 

Do not panic if the second dose is delayed | दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास घाबरु नका

दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास घाबरु नका

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा सल्ला : सहा ते आठ आठवड्यांपर्यंत घेता येतो डोस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा मिळाला नाही, तर पुढे काय असा प्रश्न पहिला डोस घेणाऱ्या अनेकांच्या मनात आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यापर्यंत हा डोस घेता येतो, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. 
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी, अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाही. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार, याची माहितीच मिळाली नाही तर कसे होणार हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.  

काही दिवसानंतरच वाढतात अँटीबॉडी
कोविड लशीच्या दोन डोसांमध्ये ४ ते ६ आठवड्याचे अंतर असावे, असे लसीकरणारा सुरूवात झाली तेव्हा ठरवण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिक संशोधनांनंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क पोर्सनुसार कोविडशिल्ड लशीच्या दोन डोसमधले हे अंतर वाढवून ६ ते ८ आठवडे करण्यात आले. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.
लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?
लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार, कोविडशील्ड लशीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५. १ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर ८१. ३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.

 

Web Title: Do not panic if the second dose is delayed