शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

बिबी व पिपरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST

कोरपना : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत महाआवास अभियान २०२०-२१ अंतर्गत कोरपना तालुक्यातील बिबी व ...

कोरपना : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत महाआवास अभियान २०२०-२१ अंतर्गत कोरपना तालुक्यातील बिबी व पिपरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत घरकुलांच्या कामाला गती येण्याकरिता संपूर्ण राज्यात महाआवास अभियान शासनस्तरावर राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध स्तरावर पुरस्कार ठेवण्यात आले. त्यामध्ये कोरपना तालुक्यातील बिबी व पिपरी अशा दोन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याने कोरपना पंचायत समितीचे नावलौकिक वाढले आहे.

पुरस्कार वितरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाले. बिबी ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच मंगलदास गेडाम, माजी उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत बिबीचे प्रशासक तथा सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी दिलीप बैलनवार, ग्राम विकास अधिकारी एस. एन. ढेंगळे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अजय सुरेश लांडगे, पिपरीच्या सरपंच रुंदा विजय कुंभारे, सचिव एन. एम. शाहा यांनी स्वीकारला.