शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

By admin | Updated: October 19, 2015 01:38 IST

येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले.

एका महिन्याचे बिल १३ हजार : न्यायासाठी ग्राहकाची पायपीटबल्लारपूर : येथील एका घरगुती वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १३ हजार २९० रुपये आकारण्यात आले. यामुळे वीज ग्राहकात असंतोष पसरला असून यासंदर्भात महावितरण कंपनी कार्यालयाचा न्यायासाठी उंबरठा गाठला. मात्र मागील आठ महिन्यांपासून त्यांना न्याय मिळाला नाही. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.येथील गौरक्षण वॉर्डातील राजू कुंचलवार यांनी घरगुती वापरासाठी डिसेंबर २०१४ मध्ये वीज मीटर घेतला. त्यांना पहिल्याच महिन्यात १ हजार ३१८ युनिट वापर झाल्याचे वीज देयक देण्यात आले. महावितरण कंपनीने या वीज ग्राहकांवर १३ हजार २९० रुपये वीज शुल्क आकारुन अकलेचे दिवे तोडले. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता बल्लारपूर कार्यालयात १७ मार्च २०१५ रोजी अर्ज सादर करुन न्याय देण्याची विनंती केली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत लक्ष दिलेच नाही.अशातच अधिकाऱ्यांची राजू कुंचलवार यांना १३ हजार ५५० रुपये वीज शुल्क भरण्यास प्रवृत्त केले. विजेची गरज म्हणून त्यांनी पूर्ण रक्कम भरली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे येणाऱ्या बिलात बील कमी करण्याचे आश्वासन दिले. नवीन वीज मिटरच्या रिडिंगनुसार वीज देयक आकारले जाणार, याची शाश्वती दिली. मात्र अद्यापही नवीन मीटर रिडिंगनुसार रक्कम कमी करण्यात आलेली नाही. यामुळे वीज ग्राहकात तीव्र नाराजी पसरली आहे.अशातच महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जास्त युनिट वापरल्याचे दाखविणाऱ्या मीटरची तपासणी करण्यासंदर्भात मीटर जमा केला. त्यासाठी ६ आॅक्टोबर २०१५ ला अर्ज सादर करुन मीटर तपासणीचा व कोणत्या दिवशी किती युनिट वापरण्यात आले, याची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार राजू कुंचलवार यांना कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी मीटर बरोबर असल्याचे सांगून परत पाठविले. मात्र ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या वीज वापराचा अहवाल देण्यास महावितरण कंपनीने नकार दिला. वीज युनिट वापर झाल्याबाबत तपासणी करणारी यंत्रणा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकाला १३ हजार ५५० रुपये एका महिन्याचे वीज बिल भरावे लागले, ही ग्राहकांची पिळवणूक आहे. यामुळे वीज ग्राहकात संताप पसरला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वीज ग्राहकाने केली आहे. (शहर प्रतिनिधी)