पोलीस ठाण्यात सुरक्षा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST2021-05-31T04:21:25+5:302021-05-31T04:21:25+5:30

या माध्यमातून बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यापुढे सुध्दा पोलिसांच्या आरोग्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. सध्या तालुक्यात कोरोना महामारीची ...

Distribution of security equipment to the police station | पोलीस ठाण्यात सुरक्षा साहित्य वाटप

पोलीस ठाण्यात सुरक्षा साहित्य वाटप

या माध्यमातून बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यापुढे सुध्दा पोलिसांच्या आरोग्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. सध्या तालुक्यात कोरोना महामारीची दहशत पसरली आहे. आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या जीवघेण्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. जीवाची पर्वा न करता जनतेचे हित जोपासत आहे.अशा या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, याकरिता सामाजिक बांधिलकीतून बँकेने त्यांच्याकरिता सॅनिटायझर, फेसशिल्ड, ऑक्सिमीटर भेट दिले .याप्रसंगी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी या भेट वस्तू स्वीकारल्या. यावेळी बँकेचे व्यवस्थापक वाराणसी चंद्रशेखर, क्षेत्रीय व्यवस्थापक निलेश पाटील, शाखा व्यवस्थापक संगम मोंढे, शुभम भगत, समीर टोनपे, निखिल पारेकर, नंदकिशोर महाले आदी कर्मचारी हजर होते.

Web Title: Distribution of security equipment to the police station