जिल्ह्यात दारूबंदी, तरीही भंगार दुकानात बाटल्यांचा खच

By Admin | Updated: October 16, 2015 01:33 IST2015-10-16T01:33:29+5:302015-10-16T01:33:29+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना वरोरा येथील भंगार दुकानात खाली बाटल्या येण्याचे प्रमाण जास्त झाले आहे.

Disposal of bottles in liquor shops in the district, but still in scrap shops | जिल्ह्यात दारूबंदी, तरीही भंगार दुकानात बाटल्यांचा खच

जिल्ह्यात दारूबंदी, तरीही भंगार दुकानात बाटल्यांचा खच

अवैध दारूविक्री : मद्यपींचे तयार होत आहेत अड्डे
चंद्रपूर : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना वरोरा येथील भंगार दुकानात खाली बाटल्या येण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. अनेक दुकानांमध्ये अशा बाटल्यांचा खच पहायला मिळत आहे. हे अवैध दारू विक्रीचे बोलके उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.
मागील सहा महिन्यांपासून शासनाची चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू आहे. असे असले तरी सीमावर्ती भागातून दारूची तस्करी करुन अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पाहिजे त्या कंपनीची आणि पाहिजे त्या प्रमाणात मद्यपींना दारू उपलब्ध होत आहे. दारू विक्रेत्यांवर कारवाई होत असली तरी दररोज नवीन विक्रेत्यांचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले नाही. भंगार दुकानांमध्ये दररोज जमा होणाऱ्या दारूच्या खाली बाटल्यांवरुन अवैध दारूविक्रीला दुजोरा मिळत आहे. रात्रीच्या अंधारात शासकीय कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाने तसेच निसर्गस्थळ, रस्त्यांच्या कडेला असलेल्या अंधारात अशी मद्यपींची ठिकाणे तयार झाली आहेत. काही हॉटेल व्यावसायिकदेखील दारू विक्री करीत असल्याची चर्चा आहे. भंगार गोळा करणाऱ्यांना अशा ठिकाणांची माहिती असल्याचे दररोज पहाटे त्या-त्या ठिकाणांवरुन खाली बाटल्या गोळा करण्याची स्पर्धा त्यांच्यात लागली असते. परिणामी बाटल्यांचा खच साचल्याचे दिसते. (प्रतिनिधी)

Web Title: Disposal of bottles in liquor shops in the district, but still in scrap shops