शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

मतदान केल्यास मिळणार सवलतीत औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM

चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांची नुकतीच बैठक पार पडली.

ठळक मुद्देनिवडणूक प्रशासनाचा उपक्रम। मतदानाची वाढविणार टक्केवारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून बोटावरील शाई दाखवल्यास औषधांवर १० टक्के सवलत दिल्या जाणार आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. शहरातील श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स व आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सने प्रतिसाद दिला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांची नुकतीच बैठक पार पडली. त्यांनी लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व उपस्थितांनी समजावून सांगितले. या बैठकीत दोन व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान केलेल्या नागरिकांना औषधी खरेदीत सवलत देण्याचे श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स व आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सच्या संचालकांनी मान्य केले. श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स एलआयसी बिल्डिंगजवळ आहे. मतदान केलेल्या नागरिकांना २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत औषधांच्या एकूण किमतीवर १० टक्के सूट देणार आहेत. गणेश दंतुलवार यांचे आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स महसूल भवनाजवळ आहे.जे नागरिक २१ ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावतील त्यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत सवलत मिळेल. मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.चंद्रपूर मतदारसंघात सर्वात कमी मतदानचंद्रपूर विधानसभा क्षेत्रात शहरी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, चिमूर या मतदारसंघाच्या तुलनेत कमी मतदान झाले होते. शिक्षणाचे प्रमाण अधिक असुनही मतदानाची टक्के का वाढत नाही, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला पडला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार जागृती करण्यासाठी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाकडे जिल्हा निवडणूक प्रशासन विशेष लक्ष देत आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा हा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला आहे.

टॅग्स :medicineऔषधं