शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित

By admin | Updated: May 13, 2017 00:35 IST

स्थानिक माजरी येथील नागलोन खुली कोळसा खदान २ मध्ये पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या.

आजपासून आंदोलन : नागलोन कोळसा खाण शेतजमीनप्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी: स्थानिक माजरी येथील नागलोन खुली कोळसा खदान २ मध्ये पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना आश्वासनाप्रमाणे नोकरी देण्यात आली नाही. त्यामुळे १३ मेपासून प्रकल्पग्रस्तांनी सहकुटुंब खाण काम बंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनादरम्यान, प्रकल्पग्रस्त कुटुंबीय खाण परिसरातच तळ ठोकून राहणार आहेत. मागील दहा दिवसांपूर्वी असेच आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वेकोलिचे १६५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले होते. यात ५० कोटी रुपयांचा वेकोलिला फटका बसला होता. वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतला नाही. मागील आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांनी नागपूर येथील वेकोलिचे अधिकारी घोष व परांजपे, वेकोलि माजरीचे महाप्रबंधक सत्येन्द्र पांडे, पोलीस उपअधिक्षक राजपुत, उपविभागीय अधिकारी, वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी, माजरीचे ठाणेदार कृष्णा तिवारी, प्रहार संघटनेचे गजानन कुबडे, अमोल डुकरे, आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलाविली. ३० एप्रिल २०१७ पर्यंत सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे लिखित आश्वासन दिले होते. त्यानंतर २८ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित व अल्पवयीन यांना वगळता सर्वांनाच नोकरी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी चालू असलेले आंदोलन ३० एप्रिलपासून तात्पुरते स्थगित केले होते. परंतु नोकरी न दिल्यास आणखी काम बंद आंदोलन करु, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला होता. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त निलेश ढवस, संदिप झाड़े, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगिता खापणे, माया ढवस, मिराबाई ढवस यांनी सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू केले. आश्वासनानंतरही ७८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश न दिल्याने पुन्हा १३ मेपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.