शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांचे छत्र हरविल्याने तन्वी-गौरी झाल्या निराधार !

By admin | Updated: February 6, 2016 01:09 IST

तीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला.

नियतीचा क्रूर खेळ : पतीच्या निधनानंतर मुलींसाठी केला संघर्षराजू गेडाम मूलतीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला आईचे प्रेमसुद्धा हिसकावून घ्यायचे होते की काय? काळाने तिच्यावरही झडप घातल्याने दहा वर्षीय तन्वी व चार वर्षीय गौरी आईविना पोरक्या झाल्या आहेत. ६५ वर्षीय एकमेव आजी असल्याने संगोपनाबरोबरच जगण्याचा प्रश्नही त्या दोघींसमोर उभा ठाकला आहे.मूल येथील भारती प्रभाकर बोर्डावार यांचा विवाह चंद्रपूर येथील सुशिल केशव आयतवार यांच्याशी झाला. त्यांना तन्वी (१०) व गौरी (४) अशा दोन मुली झाल्यात. सर्व काही सुरळीत संसार सुरू असताना १२ एप्रिल २०१२ ला एका अपघातात सुुुशिलचा मृत्यू झाला. लहान मुलींचा आधार गेल्याने भारती हादरून गेली. आता पतीशिवाय या मुलींना वाढवायचे कसे, असा प्रश्न तिच्यापुढे उभा ठाकला. मात्र मुलीकडे बघून तिने जगण्यासाठी संघर्ष सुरू केला. मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलींना सांभाळत असताना मात्र भारतीला आजार जडला. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता तेथील डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने आजार बरा होण्याऐवजी वाढला. त्यानंतर नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचार केला. तेथे जवळचा सर्वच पैसा खर्च झाला. एवढे पैसे खर्च करूनही प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. तब्बल सहा महिने मृत्यूशी झुंज देत भारती जगण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिची प्रकृती इतकी गंभीर झाली की, तिच्या जगण्याची आशाच मावळली. काही दिवसातच तिने तन्वी आणि गौरी या दोघींसह जगाचा कायमचा निरोप घेतला. वडिलांचे अपघाती निधन झाले. आईचा आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे आता तन्वी व गौरी निराधार झाल्या. ६५ वर्षीय आजी बेबीबाई आयतवार या त्यांच्यासाठी आता आधार उरला आहे. पण पुढे जगायचे कसे? असा प्रश्न त्या दोघीसमोर उभा ठाकला आहे.