शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांना काम देण्यास नकार

By admin | Updated: December 26, 2015 01:20 IST

मूल येथील कृषी बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांची दिशाभूल करीत त्यांना काम देण्यास नकार

न्याय देण्याची मागणी : मूल बाजार समितीतील माथाडी कामगार वाऱ्यावरचंद्रपूर : मूल येथील कृषी बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांची दिशाभूल करीत त्यांना काम देण्यास नकार दिल्याने माथाडी कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमरण उपोषण केले. हे उपोषण करताना लोकशाही व शांततेचा मार्ग अवलंबिण्यात आला. या उपोषणादरम्यान बाजार समिती प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून बाहेरील अनोंदित कामगार कामावर लावले व त्यांच्याकडून कामे करवून घेतली. शासनाने याची दखल घेऊन माथाडी कायद्याची ३१ जानेवारी २०१५ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त बाजार समित्यात अंमलबजावणी करण्याची व मूल बाजार समितीत अंमल बजावणीची हमी दिली. तसेच कामगारांना पुर्ववत कामगार रुजू होण्याची विनंती केली. शासन व अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. परंतु कामावर रुजू झालेल्या माथाडी कामगारांना बाजार समिती प्रशासनाने काम देण्यास नकार दिला. याबाबत शासन अधिकारी यांना अवगत करण्यात आले. त्यांनी फक्त भ्रमणध्वनीद्वारे प्रशासनाला निर्देश दिले. या अधिकाऱ्यांचा आपल्या प्रशासनावर नियंत्रण व वचक नसल्यामुळे व उपोषणकर्त्यां कामगारांचा वैयक्तिक वचपा काढण्याच्या उदात्त हेतुने यांच्या निर्देशाला न जुमानता कामगारांना कामावरून वंचित केले.माथाडी कामगारांना काम मिळवून देणे, कामगार उपलब्ध असून काम न मिळाल्यास मजुरी मिळवून देणे, कामाच्या ठिकाणी पुर्वी काम करीत असलेल्या कामगारांना प्राधान्याने काम मिळवून देणे ही जबाबदारी माथाडी मंडळाची असतानाही या बेदखल झालेल्या कामगारांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. माथाडी कायदा व माथाडी मंडळ माथाडी कामगारांना संरक्षण देणारे असूनही आज माथाडी कामगार असंरक्षित झाला आहे. पणन संचालक महाराष्ट्र यांचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निर्देशाला बाजार समिती प्रशासनापुढे किंमतच नसल्यामुळे ते ही कामगारांना न्याय देण्यास अपयशी ठरले आहे. माथाडी कायद्याची वारंवार मागणी करणाऱ्या कामगारांना डावलून त्या ठिकाणी माथाडी नोंदीत नसलेल्या कामगारांनी भरती करण्यात आली. संगनमताने माथाडी कामगारांना उपोषणापासून परावृत्त करुन त्यांना रोजगारापासून वंचित करण्याचा डाव असल्याचा आरोप माथाडी कामगारांचे नेते रमजान खान पठाण अशरफी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. (प्रतिनिधी)