शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकृषक करात पाच पटीने वाढ करण्याची मागणी

By admin | Updated: December 18, 2014 00:50 IST

वापरात नसलेल्या निवासी भुखंडावरील वार्षिक अकृषक करात पाच पटीने वाढ करून आकारणी करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने शासनाकडे केली आहे.

चंद्रपूर : वापरात नसलेल्या निवासी भुखंडावरील वार्षिक अकृषक करात पाच पटीने वाढ करून आकारणी करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने शासनाकडे केली आहे. अनेक ठिकाणी कृषी योग्य शेतजमिनींना अनावश्यकपणे अकृषक करून निवासी वापराचे लेआऊट म्हणून विकणे हा भरमसाठ फायद्याचा धंदा मोठ्या तेजीत सुरु आहे. जिकडे तिकडे ले-आऊट पडल्याने छोट्या मोठ्या सर्व शहराच्या मार्गावर दूरपर्यंत लेआऊट दिसून येतात. या व्यवसायातील भरमसाठ फायद्यामुळे विक्रीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे लेआऊट निर्माण होत आहेत. लेआऊट विक्रेत्ये फसव्या जाहिराती, इनामांचे आमीष दाखवत आहेत. तर कमीशनच्या लालसेपोटी दलालांनी टाकलेल्या जाळ्यात ग्राहक फसत आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांकडून अशा अकृषक भूखंडामध्ये गरजेशिवाय अनावश्यकपणे गुंतवणूक होत आहे. गरत नसतांनाही केवळ गुंतवणूक करून लाभ मिळविण्याच्या अमिषाने खरेदी केलेले प्लॉट अनेक वर्ष तसेच पडून असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. या व्यवहारातून ले-आऊट विक्रेते काही महिन्यातच प्रचंड नफा कमावून मोकळे होत असले तरी ग्राहकांचे अनेक वर्षे वाट पाहण्यातच जात आहेत. अडचणीच्या वेळेसही ही गुंतवणूक कामी पडत नाही. तसेच प्लॉट विकतांना या व्यवसायातील दलाल अडवणूक करून प्लॉटधारकांना वाजवी भाव सुद्धा मिळू देत नाही. या व्यवसायामुळे कृषीयोग्य जमिनीमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रचंड वेगाने घट होत आहे. शासनाने अकृषक करात वाढ केल्यास ग्राहक देखील विचारपूर्वक गुंतवणूक करतील आणि शासनाकडे देखील विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध होऊ शकतो. या निधीचा उपयोग उर्वरीत कृषीयोग्य जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचन सोयी करण्यासाठी अनुदान म्हणून करावा, अशी मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)