शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज माफियावर कारवाई करण्याची मागणी

By admin | Updated: July 17, 2017 00:48 IST

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून तीन वर्षापूर्वी या जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून तीन वर्षापूर्वी या जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत होता. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झालीच पाहिजे, याकरिता महिलांनी सतत पाच वर्षे आंदोलन केली. अखेर या जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली. दारूबंदी झाली असली तरी अवैध मार्गाने दारूविक्री सुरू आहे. अवैध दारू पकडण्यात पोलीस व्यस्त असताना याचा फायदा ड्रग्ज माफीयांनी घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.चंद्रपुरातील महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांना ड्रग्जचे व्यसन लागले आहे. कॉलेज परिसरात ब्राऊन शुगर, अफीम, गांजा, गर्द यासारख्या मादक द्रव्यांची विक्री करण्यात येत असून विक्री करणारे तसेच नशा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी २० वर्षाच्या खालील वयाचे आहेत. ड्रग्जची विक्री करताना कॉलेज परिसरात दोन विद्यार्थ्यांना ब्राऊन शुगरसह पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपुरातील वर्दळ नसलेले क्षेत्र ड्रग्ज सेवन करणाऱ्या युवकांसाठी स्वर्ग असून वरोरा नाक्याजवळ पुलाखाली, कॉलेज परिसरातील सुनसान क्षेत्र, लोहारा जंगल, जुनोना जंगल, रय्यतवारी कॉलरी, बगीचे, लालपेठ कॉलरी, जमनजट्टी अशा अनेक ठिकाणी युवक, युवती नशेत डोलताना आपणास दिसेल. विद्यार्थी अभ्यास सोडून नशेच्या आहारी गेल्यामुळे पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नशेपासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येक कॉलेजमध्ये मिटींग घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महासचिव हिरामण खोब्रागडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. ड्रग्ज माफीयावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच जनजागृतीकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले. शहर ठाणेदार भगत, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनाही भेटून ड्रग्ज माफीयावर कारवाई करण्याची मागणी केली.