शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

वैदिक धर्मव्यवस्था झुगारुन महाराणी अहल्याबार्इंनी स्वराज्य निर्माण केले

By admin | Updated: December 19, 2015 00:54 IST

महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा,

चंद्रपुरात व्याख्यानमाला : गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा, धर्मशास्त्रातील रुढी परंपरेसह मनुस्मृती झुगारुन महाराणी अहल्याबाई होळकरांनी स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्याख्यानमालेत सांगितले. शिवमहोत्सव समितीद्वारा प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीषा घाटे, प्रमुख व्याख्याते म्हणून गंगाधर बनबरे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव महादेव ढुमणे, नगरसेविका ललिता गराड, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, नंदा शेळकी, डॉ. पल्लवी डोंगरे, सरपंच निर्मला मिलमिले, योगिता धांडे, अ‍ॅड. राजश्री मोहितकर, स्नेहलता आखरे, कमला वडस्कर, डॉ. एकता कुरेकर, शिला अडकिने, रत्नमाला बावणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गंगाधर बनबरे पुढे म्हणाले, महाराणी अहल्याबाई यांच्या पतीचा वयाच्या २९ व्या वर्षी खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी पेशवाईचे राज्य होते. पतीच्या निधनांतर ११ बायका सती जात गेल्या. मात्र अहल्याबाईचे सासरे मल्हारराव यांनी तिला सती जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अनेकांच्या बायका सती गेल्या. त्यावेळी मल्हारराव तिचे सासरे यांनी तिला खंबीरपणे बुरसट विचारसरणी व प्रथेच्या विरोधात संघर्ष करण्याचे प्रोत्साहन दिले, आत्मबळ दिले. त्यावेळेस पराक्रमी अहल्याबाईने लढाईचे सर्व कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे पराक्रमी अहल्याबाईंनी पेशवाईच्या मुजोरीचा सामना केला. यानंतर अनेक स्वाऱ्यावर चढाई करुन जिंकल्या आणि तिने स्वराज्य निर्माण केले. त्यामुळेच तिचे नाव इतिहासातील महानायिकांमध्ये घेतले जाते. आज काळ व परिस्थिती बदलली. परंतु आजही मनुस्मृती विचारसरणीचा बिमोड झाला नाही. त्यांच्या मानसिकतेबरोबर महिलांच्या मनातील गुलामगिरी संपण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बनबरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली भेदे यांनी केले तर आभार प्रतिभा भोयर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)