शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयावरून पुन्हा वाद

By admin | Updated: January 28, 2015 23:12 IST

वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हाडा परिसरातील जागा योग्य असतानाही वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांचे हित न बघता केवळ आपल्या कुटुंबीयातील सदस्यांच्या

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हाडा परिसरातील जागा योग्य असतानाही वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांचे हित न बघता केवळ आपल्या कुटुंबीयातील सदस्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.म्हाडामध्ये शासकीय कार्यालयासाठी ७५ एकर जागा आरक्षित आहे. मात्र येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांना ही जागा पसंत येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुनगंटीवार आपला हट्टा पूर्ण करण्यासाठी जागा बदलवित आहे. यासंदर्भात आपण अधिक चौकशी केली असता म्हाडा येथील आरक्षित जमिनीमध्ये मुनगंटीवार यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावाने २० ते २५ एकर जमिन आहे. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास सरकार ही जागा शासकीय दराने घेईल. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठीच मुनगंटीवार वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलवित असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.अनुभवी नेते आणि राज्यमंत्रीमंडळातील त्यांचे स्थान लक्षात घेता नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांनी म्हाडा परिसरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढाकार घ्यावा. म्हाडा परिसरात आपली ७ एकर जमीन आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय या परिसरात आणल्यास आपल्याला कोणताही नफा-तोटा होणार नसल्याचेही ते म्हणाले. बारामतीच्या धर्तीवर वित्तमंत्री तथा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये देवून विकास साधावा असेही ते म्हणाले.यासंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही. (नगर प्रतिनिधी)