वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू

By Admin | Updated: June 3, 2015 01:34 IST2015-06-03T01:34:58+5:302015-06-03T01:34:58+5:30

कुलर सुरु करुन त्यातील पाण्याच्या छिद्रातील कचरा लोखंडी साहित्याने साफ करताना विद्युत शॉक लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Death of husband on the day of Vatapournima | वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू

वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू

वरोरा : कुलर सुरु करुन त्यातील पाण्याच्या छिद्रातील कचरा लोखंडी साहित्याने साफ करताना विद्युत शॉक लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना तालुक्यातील पाटाळा येथे घडली. मृत युवकाचा ५ मे रोजी विवाह झाला होता.
रामदास चरणदास बरडे (२७) असे मृत युवकाचे नाव आहे. ममंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कुलर चालू ठेवून कुलरमधील पाण्याच्या छिद्रातील कचरा लोखंडी साहित्य घेवून साफ करीत असताना विद्युत धक्का लागला.
त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला उपचारार्थ वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. (तालुका प्रतिनिधी)
पाटाळा गावात शोककळा
विवाहाला एक महिनाही पूर्ण झाला नाही आणि मंगळवारी वटसावित्री असल्याने घटनेच्या वेळी मृताची पत्नी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा करण्यास गेली होती. पूजा करुन घरीपरताच पतीचा मृतदेह दिसल्याने पत्नीची अवस्था बघण्याजोगी नव्हती. वटसावित्रीच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of husband on the day of Vatapournima