शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन भावंडांवर उदरनिर्वाहाचे संकट

By admin | Updated: March 28, 2016 00:50 IST

चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

नियतीने डाव साधला : चार वर्षांपूर्वी पित्याचे तर आता मातेचे छत्र हिरावलेसावली : चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेने तीन मुले निराधार असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.गजानन मोहुर्ले यांचे कुटुंब मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. अशातच चार वर्षापूर्वी गजाननने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी बेबीबाईने मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चार वर्षापासून काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत होती. मात्र शुक्रवारी जंगलामध्ये सरपणासाठी गेली असता तिला फीट आली. सोबतच्या महिलांनी तिला तत्काळ गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र शनिवारी तिची प्राणज्योत विझली. त्यामुळे परिसरात हळहळ पसरली आहे. आई-वडिलांच्या निधनाने तीन भावंडे मात्र निराधार झाली आहेत. मोठा मुलगा अमित गजानन मोहुर्ले (१७) व मुलगी सायली (१५) हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. लहान मुलगा विशाल (१२) हाही शिकत आहे. घरात कुठलीही शेती नाही की उपजीविकेचे दुसरे साधन नाही. मजुरी करून उदरनिर्वाह करणे हाच त्याचा रोजगार. मात्र तीनही भावंडे लहान असल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.नियतीने आपला डाव साधून अमीत, सायली व लहानगा विशाल या निरागस भावंडाचे मातृ-पितृ छत्र हिरावले. याची त्या भावंडांना जाणीव असली तरी त्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे. हा साऱ्या समाजमनाचा चिंतनाचा विषय आहे. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे मायबाप लोकप्रतिनिधींनी आणि दानशुरांनी या आपत्तीग्रस्त तीन भावंडांकरिता मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)