शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण

By admin | Updated: March 29, 2015 01:13 IST

तालुक्यातील चारगाव- भारपायली-मानकापूर -पांढरसराड या पाच किलोमिटर रस्त्यावर यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे.

सावली : तालुक्यातील चारगाव- भारपायली-मानकापूर -पांढरसराड या पाच किलोमिटर रस्त्यावर यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु याच रस्त्यावर खडीकरण करण्याचा अफलातून प्रकार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व कंत्राटदारांकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून सदर कामाची मंजुरी देण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत चारगाव-भारपायली-पांढरसराड मानकापूर या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. सदर मार्गावरचे डांबर अनेक ठिकाणी उखडल्यामुळे पुन्हा डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र संबंधित यंत्रणेने डांबरीकरणाऐवजी खडीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर केल्या जात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. चार ते पाच किलोमिटरच्या खडीकरणासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. २.२ किलोमिटरचे दोन भाग पाडून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामासाठी १७ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करवून घेतला आहे.खडीकरणाच्या कामाची गरज नसतानाही केवळ कंत्राटदार आणि स्वत:च्या फायद्यासाठी ही कामे मंजूर केल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वित्तीय वर्षात मंजूर झालेल्या सदर कामावरील आगाऊ रकमेची उचल संबधित कंत्राटदाराने केली असल्याची धक्कादायक माहिती आहे. कोणतेही साहित्य न टाकताच रकमेची उचल करून प्रत्यक्षात मात्र सदर काम या वित्तीय वर्षात करण्यात येत आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण करण्याचे कारण काय? राज्यातील सर्व गावे डांबरी रस्त्याने जोडली जावीत, असा शासनाचा निर्णय असतानासुद्धा डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण करून अधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, आलेला निधी खर्च होत नाही म्हणून फक्त खर्च करण्यासाठीच सदर खडीकरण करण्यात येत आहे काय, असा सवाल गावकरी करीत आहेत. या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. असे असतानाही अशा प्रकारची कामे होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या पालेबारसा जनकापूर या दोन किलोमिटर रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. संबंधीत काम मूल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात्.ा यंत्रणेमार्फतीने करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)