शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार व रविवारच्या बाजारावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

मागील काही वर्षापासून आनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या जागेमध्ये बुधवार या आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बुधवार ऐवजी रविवारला बाजार भरविण्यात येत होता. त्यामुळे किरकोळ दुकानदारांनी आनंदवन चौकापासून चिमूर मार्गालगत बुधवार बाजार सुरू केला.

ठळक मुद्देआनंदवन चौक : बाजारात होत होती लाखोंची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आनंदवन चौकामधून चिमूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा आठवड्यातून रविवार व बुधवार या दिवसात बाजार भरत होता. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बुधवार व रविवारचा बाजार प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान, लाखो रुपायांची उलाढाल बंद झाली आहे.मागील काही वर्षापासून आनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या जागेमध्ये बुधवार या आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बुधवार ऐवजी रविवारला बाजार भरविण्यात येत होता. त्यामुळे किरकोळ दुकानदारांनी आनंदवन चौकापासून चिमूर मार्गालगत बुधवार बाजार सुरू केला. कोरोनाच्या सावटाने ग्रामपंचायतच्या जागेवरील रविवार बाजार बंद केल्याने बुधवार व रविवार या दोन दिवसात चिमूर रस्त्यालगत मागील कित्येक दिवसापासून बाजार भरत होता. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना या दोन्ही दिवसात नागरिक बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते. या बाजारावर कुठलेही नियंत्रण नसल्याने रस्त्याच्या कडेला व्यवस्थीत जागा नाही. अगदी चिमूर मार्गाला लागून आठवड्यातून दोन दिवस बाजार भरत असल्याने या दोन्ही दिवसात वाहतूक कोंडी होत होती. वाहने पार्किंगला जागा नसल्याने रस्त्यावर वाहने उभे करून बाजार भरत होता. बाजार झाल्यानंतर त्या जागेची स्वच्छता होत नसल्याने त्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने या बाजाराबाबत चौकशी करणे सुरू केले असता कुठलीही मान्यता नसल्याचे लक्षात आले. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सदर बाजार प्रशासनाने बंद केला. यामुळे नागरिकांची निराशा झाली असून व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.कोरोनामुळे बाजार बंद आहे. सदर बाजाराला बोर्डा ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. बोर्डा ग्रामपंचायतच्या जागेवर बाजार भरत नसल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे.- यादव चाफलेग्रामविकास अधिकारीग्रामपंचायत, बोर्डा

टॅग्स :Marketबाजार