आवळगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:01:00+5:30

आवलगाव येथील हा युवक मुंबई येथून १४ जून २०२० रोजी तीन सहकाऱ्यांसोबत गावात आला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. मात्र, ते पुलगावालाच थांबले. गावात पोहोचल्यानंतर सदर युवकाला जि. प. शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.

Corona positive found in Avalgaon | आवळगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह

आवळगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ५५ रूग्ण : अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २९

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील आणखी एका २५ वर्षीय युवकाचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने गांगलवाडी येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील युवकाचा स्वॅब घेण्यात आला होता.
आवलगाव येथील हा युवक मुंबई येथून १४ जून २०२० रोजी तीन सहकाऱ्यांसोबत गावात आला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. मात्र, ते पुलगावालाच थांबले. गावात पोहोचल्यानंतर सदर युवकाला जि. प. शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. गुरूवारी त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह बाधितांची संख्या ५५ झाली आहे. आतापर्यंत २६ जण कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यामध्ये सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९ असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकूण २५ कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. एक कंटेनमेंट झोन पुन्हा सुरू होणार आहे. १४ झोन बंद करण्यात आले असून सध्या जिल्ह्यात १० कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

भाडे वसुलीची सक्ती नको
कोरोना विषाणू संसर्ग काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व ब्युटीपार्लर व्यावसायिकांना प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी नाही. मात्र खासगी इमारतीमध्ये या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या इमारतीच्या मालकांना भाडे वसुलीची सक्ती न करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरूवारी व्हिडिओ संदेशद्वारे दिला

Web Title: Corona positive found in Avalgaon