दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:20+5:302021-07-08T04:19:20+5:30

बाधित आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर २, नागभीड १, मूल १, ...

Corona has not died in two days | दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही मृत्यू नाही

दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही मृत्यू नाही

बाधित आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर २, नागभीड १, मूल १, सावली १, राजुरा २, वरोरा ५ आणि कोरपना तालुक्यातील एकाचा समावेश आहे. भद्रावती, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, जिवती एकही रुग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ७८६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ६१ झाली आहे. सध्या १७५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ७२ हजार ८३९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ८५ हजार ९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,५३२ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Corona has not died in two days