वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:18+5:302021-04-25T04:28:18+5:30

चंद्रपूर : वीज ग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना ...

Convenience to send meter readings to electricity customers manually | वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय

वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय

चंद्रपूर : वीज ग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. महावितरण मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीज बिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टिम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल.

महावितरण मोबाईल ॲपमध्ये ‘सबमिट मीटर रीडिंग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रीडिंग घेताना वीज मीटरच्या स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्ल्यूएच असे दिसल्यानंतरच (केडब्ल्यू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मॅन्युअली रीडिंग ॲपमध्ये नमूद करावे व सबमिट करावे. मोबाईल ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमिट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Convenience to send meter readings to electricity customers manually