शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या नियंत्रित म्हणजे सुखी कुटुंब

By admin | Updated: July 29, 2014 23:43 IST

जागतिक पातळीवर भारताची लोकसंख्या चवथ्या स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी सकारात्मक भूमिका पार पाडल्यास लोकसंख्या

लोकसंख्या स्थिरता कार्यक्रम : दोन कन्या अपत्य मातांचा सत्कारबल्लारपूर : जागतिक पातळीवर भारताची लोकसंख्या चवथ्या स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी सकारात्मक भूमिका पार पाडल्यास लोकसंख्या नियंत्रित राहून प्रत्येकांना सुखी कुटुंबाचे समाधान मिळणार असल्याचे मत रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष रामभाऊ टोंगे यांनी लोकसंख्या स्थिरता कार्यक्रमात व्यक्त केले.तालुक्यातील विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लोकसंख्या स्थिरता पंधरवडा कार्यक्रमाचे औचित्य साधून दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम, सरपंच बंडू गिरडकर, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार, डॉ. अश्विनी बेले यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद रामभाऊ टोंगे होते. यावेळी मार्गदर्शन करताना हरीश गेडाम म्हणाले, वंशाचा दिवा म्हणून आपण मुलाचा आग्रह करतो. यामुळे स्त्री भृणहत्येचे प्रमाण वाढले आहे. गर्भ निदान चाचणीचा प्रकार याला कारणीभूत आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, असे बोलून दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांचा त्यांनी गौरव केला. दरम्यान, सावित्रीबाई फुले कन्या योजनेतील लाभार्थी सुनिता चंदू मुडे व गांगुला किशोर मालकर यांना धनादेश व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.दोन कन्या अपत्यांवर शस्त्रक्रिया करुन नवा आदर्श निर्माण करणाऱ्या पिंकी बादल हजारे, माधुरी रविंद्र धुलकर व शालु बंडू मठ्ठे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ, अनिल कुकडपवार यांनी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. अश्विनी बेले यांनी केले. संचालन ज्योती गेडाम यांनी तर आभार रमेश मेश्राम यांनी मानले. अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वाघमारे, रिता मिरपगार, गजभिये, वाघमारे , कांता मून यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)