शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा’ कर्जावर धनिकांचा ताबा

By admin | Updated: February 12, 2016 01:37 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे.

सामान्यांना नो एन्ट्री : कर्ज वाटपाचा अहवाल गुलदरस्त्यातसिंदेवाही : केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे. राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्यांच्या अर्जाला कचरापेटी दाखवित आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असले तरी अग्रणी बँकेने हा अहवाल गुलदस्त्यात ठेवला आहे. यावर बँकेचे व्यवस्थापक बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मुद्रा योजनेतील कर्ज वाटपाची उद्दीष्ट अग्रणी बँकेने दडवून ठेवले आहे. तर लोकप्रतिनिधी व स्थानिक धनदांड्यांनी याचा फायदा घेणे सुरू केले आहे. या योजनेत आतापर्यंत १५० ते २०० नागरिकांनी जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वितरीत करण्यात आल्याचे समजते. मात्र हा संपूर्ण अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या योजनेची माहिती देण्यासही बँकेचे व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहेत. साधा छापील अर्जही दिला जात नाही. तालुक्यातील हजारवर अर्ज सादर केल्याची माहिती आहे. परंतु सर्व कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या अर्जदारांना कर्ज बँकांनी दिला, त्यांनी कोणता व्यवसाय सुरू केला, याची माहितीही शाखा व्यवस्थापकाला नाही. नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक सर्व नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या येथे राहत असल्याकारणाने फक्त उद्दिष्टपूर्ण करणे हा त्यांचा हेतु आहे, असे समजते. (शहर प्रतिनिधी)