शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्‍तांचे योगदान, आणीबाणीचा काळा इतिहास, योगाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन, २३ जून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी ...

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन, २३ जून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्‍मृतीदिन, २५ जून रोजी आणीबाणी विरोधी काळा दिवस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७८ व्‍या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे सार्वजनिक प्रसारण हे चार महत्त्वाचे कार्यक्रम राबविण्‍याचे निर्देश दिले आहेत. हे चारही कार्यक्रम या देशाच्‍या अस्मितेशी, इतिहासाशी संबंधित आहेत. त्‍यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच महानगरात हे कार्यक्रम यशस्‍वीतेने राबवावे, असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीण व महानगर शाखेची ऑनलाइन बैठक पार पडली.

या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्‍त राष्‍ट्रसंघात २१ जून हा दिवस आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला. ५ हजार वर्षांची परंपरा योगाला आहे. श्रीमद भगवद गीतेमध्‍ये भगवान श्रीकृष्‍णाने योगाचे महत्त्व विषद केले. संयुक्‍त राष्‍ट्रसंघात १७५ देशांनी या प्रस्‍तावाला अनुमोदन दिल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी हे चारही कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित होतील, याची यावेळी माहिती दिली. बैठकीला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कीर्तीकुमार भांगडीया, जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, ॲड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्‍हेरी, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष, हरिश शर्मा, भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा नेते प्रमोद कडू, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सदस्‍य अंजली घोटेकर, जिल्‍हा महिला आघाडी अध्‍यक्ष अल्‍का आत्राम, जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहुले, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो ग्रामीण अध्‍यक्ष आशिष देवतळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.