चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:42+5:30

नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष करीत राहणार, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.

Continuous efforts will continue for Chimur revolution district | चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार

चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार

Next
ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : खडसंगी येथे कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : मागील पाच वर्षात चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वच स्तरावरून विकासाची कामे सुरू आहे. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष करीत राहणार, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.
खडसंगी-मूरपार जि.प. क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नीलम राचलवार, बकाराम मालोदे, डॉ. श्याम हटवादे, राजू देवतळे, दिगांबर खलोरे, जि.प. सदस्य रेखा कोरेकर, पं.स. सदस्य पुंडलिक मते, पं.स. सदस्य अजहर शेख, जेष्ठ नेते दिलीप पाटील कारेकर, गुलाब फरकाडे, दिलीप पाटील नलोडे, एकनाथ थुटे, गीता लिंगायत, छाया कनचलवार, माया नन्नावरे, पायल कापसे, रत्नमाला मेश्राम, भारती गोडे, सरपंच यशोदा तराळे, सरपंच ममता गायकवाड, मधुकर बन्सोड, बबलू पाटील थुटे, बाबाराव नन्नावरे, नामदेव हिवरकर, शामराव ननावरे, खेमराज इसनकर, विजय पाटील झाडे, हंसराज श्रीरामे, अशोक कामडी, रमेश कनचलवार, अफरोज पठाणआदी उपस्थित होते.
आ. भांगडिया म्हणाले, चिमूर क्रांती जिल्हा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे. पाच वर्षांपासून क्षेत्रात अनेक विकासकामे झाली आहेत. राज्यात नवीन जिल्हे होतील तेव्हा त्यात चिमूरचे नाव निश्चितच असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प. क्षेत्र प्रमुख विनोद चोखरे, पवन निखाडे, एकनाथ धोटे, ज्ञानेश्वर मेश्राम, विलास घाडगे, संजय खाटीक, मंगेश भुसारी, मनिष नाईक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो युवकांनी व महिलांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. संचालन विवेक कापसे तर प्रास्ताविक अजहर शेख यांनी केले.

Web Title: Continuous efforts will continue for Chimur revolution district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.