शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घरांचे बांधकाम झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

बाॅक्स बांधकाम साहित्य लाॅकडाऊन आधीचे दर नंतरचे दर ...

बाॅक्स

बांधकाम साहित्य लाॅकडाऊन आधीचे दर नंतरचे दर

वाळू २६००० ५४०००

गिट्टी १४००० १८०००

विटा ५५०० ६५००

स्टील ४००० ४७००

सिमेंट २६० ३२०

बाॅक्स

बांधकाम साहित्याचे दर का वाढले ?

लाॅकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले होते. त्यानंतर शिथलता मिळताच बांधकाम करणे सुरु आहे. अनेकांनी घरांचे बांधकाम सुरु केले आहे. मागणी वाढल्यामुळे साहित्याचे दर वाढले आहे. विशेषत: लाॅकडाऊनमध्ये अनेक कंपन्या बंद होत्या. उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. जसे विटा तयार करणे पूर्णपणे बंद होते. आता बांधकाम सुरु झाल्यामुळे मागणी वाढली. मात्र अनेकवेळा विटा मिळत नसल्यामुळे दर वाढवून विक्री केली जात आहे.

-----

चंद्रपूर : लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून, या म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस घर बांधणे सामान्य नागरिकांना अवघड होत आहे. कोरोना लाॅकडाऊननंतर तर बांधकाम साहित्याचे दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्न ठरत आहे.

सामान्यत: दिवाळीनंतर घर बांधकाम करण्याचा नागरिकांचा कल असतो. मात्र मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले त्यामुळे सर्वत्र ठप्प झाले. आता अर्धवट असलेले बांधकामे पूर्ण केल्या जात आहे. त्यातच लाॅकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्या बंद असल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत साहित्याची आवक घटल्यामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे. विशेष म्हणजे, अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे लपून छपून काहीजण वाळू पुरवित असले तरी भाव मात्र अव्वाच्या सव्वा द्यावा लागत आहे. लाॅकडाऊनपूर्वी एक हायवा वाळूसाठी साधारणत: २६ हजार मोजावे लागत होते. आता त्याचे दर ५४ ते ५५ हजारापर्यंत पोहचले आहे. तर गिट्टीचेही दर तीन ते चार हजाराने वाढले आहे. एक हजार विटांसाठी ५ पाच हजार मोजावे लागत होते. आता तेवढ्याच विटांसाठी ६ हजार ५०० रुपयांपर्यंत दर वाढले आहे. सिमेंटचेही दर वाढले असून २५० ते २६० रुपयांना मिळणारी सिमेंट बॅंग आता ३२० रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर बांधणे अवाक्याबाहेेर जात आहे.

-

कोट