शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम

By admin | Updated: October 21, 2016 01:08 IST

भाजपा वाचाळविरांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला मोठमोठी स्वप्न दाखविली.

नरेश पुगलिया : बल्लारपुरात पार पडला काँग्रेसचा मेळावा, इच्छुकांच्या मुलाखतीबल्लारपूर : भाजपा वाचाळविरांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला मोठमोठी स्वप्न दाखविली. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास केंद्र व राज्य सरकारला अद्याप यश आले नाही. यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत जनता काँग्रेसला मतदान करुन विजयी करणार, असा विश्वास व्यक्त करुन काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम राहिली आहे, असे मत काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक बालाजी सभागृहात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पुगलिया बोलत होते.यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, टी. पद्माराव, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे, सुनंदा आत्राम, छबुताई मेश्राम, न.प.गटनेते देवेंद्र आर्य, नगरसेवक भास्कर माकोडे, शांताबाई बहुरिया, वंदना तामगाडगे, शोभा महतो, अ‍ॅड.मेघा भाले, तारासिंग कलशी, मनोहर फुलझेले, मनपा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, नगरसेवक नासीर खान, अ‍ॅड. हरिश गेडाम आदींची उपस्थिती होती.नरेश पुगलिया पुढे म्हणाले, काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा पारदर्शक व कार्यक्षम राहिली आहे. यामुळेच आपण १९७८ पासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून आपले प्रेरणास्थान माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आहेत. तेव्हापासून ४० वर्ष काँग्रेसची सेवा केली. बल्लारपूर नगरपरिषद सार्वत्रीक निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली जाणार आहे. काँग्रेसचे योग्य उमेदवार असतील, तरच आपण प्रचारात उतरु, असेही ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. यासाठी नव्या जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीनंतर बल्लारपूर शहरात काँग्रेस पक्ष सत्तारुढ होणार, असा विश्वास पुगलिया यांनी व्यक्त केला. संचालन नासिर खान यांनी तर आभार देवेंद्र आर्य यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)अध्यक्षपदासाठी आठ उमेदवारांची दावेदारी बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे. यावेळी नगराध्यक्ष पदाची निवड थेट मतदार करणार आहेत. यामुळे नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. यासाठी तब्बल आठ जणांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्याचप्रमाणे १६ प्रभागातील ३२ जागेवर ८२ उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केले. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे अध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे.