शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जीवती व कोरपन्यात काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: January 12, 2016 00:50 IST

जीवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

नगरपंचायत निवडणूक : गोंडपिपरीत बंडखोरांनी मारली बाजीचंद्रपूर: जीवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. जीवती व कोरपन्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, तर गोंडपिपरीत सर्वाधिक १३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. सोमवारी सकाळी १० वाजतापासून कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला कोरपना नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी अतिशय चुरशीची निवडणूक झाली. कोरपना येथे काँग्रेसचा विजयी जल्लोष चंद्रपूर : कोरपना नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक म्हणजे १४ जागा बळकावल्या. येथे शेतकरी संघटनेचा एक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. निवडणूक निकालानंतर विजय बावणे यांच्या नेतृत्वात विजयी रॅली काढून कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कोरपना येथे काँग्रेसचे नंदा बावणे, उज्वला धारणकर, शेख फरीदा अंजूम ईस्माईल, संगीता पंधरे, कांताबाई भगत, अर्चना पारखी, सय्यद शम्मशाद परवीन उमर, रामदास पंधरे, ज्योत्स्रा खोबरकर, विजय तेलंग, रेखा चन्ने, मनोहर चन्ने, सय्यद मसुद अली तायर अली, राधिका मडावी हे निवडून आले. तसेच अपक्ष सय्यद सुहेल आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक डोहे व अपक्ष सुभाष तुराणकर हे निवडून आले. जीवती नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने १० जागांवर विजय मिळविला. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, तर भाजपाचे तीन उमेदवार निवडणूक आले. गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अपक्षांनी चमत्कार घडविला. अत्यंत चुरशीचा झालेल्या निवडणुकीत तब्बल सात उमेदवार निवडून आले, तर भाजपाला सहा, कॉंग्रेसला तीन तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागलेकोरपन्यात कॉंग्रेसच्या बावणे गटाचे वर्चस्वसोमवारी जाहीर झालेल्या निकालाने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी संघटना या प्रमुख राजकीय पक्षांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. कोरपना नगरपंचायतीची निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. ही निवडणूक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी अन्य विरोधी राजकीय पक्षांनी मोठी ताकद लावली. परंतु विरोधकांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. निकालानंतर विजय बावणे यांच्या नेतृत्वात शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. कोरपना शहराचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे यावेळी विजय बावणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.