शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

हाथरस घटनेच्या प्रकरणाच्या पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली दिला जावा, देशाचे राष्ट्रपती दलित आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देठिकठिकाणी निवेदन : राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा - प्रतिभा धानोरकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील गांधी चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.हाथरस घटनेच्या प्रकरणाच्या पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली दिला जावा, देशाचे राष्ट्रपती दलित आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली. आंदोलनात चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, जि.प. सदस्य ममता घनश्याम डुकरे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव मलक शाकीर, महाराष्ट्र अ. जा. उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, नगरसेविका संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मंगेश डांगे उपस्थित होते.पोंभुर्णात वंचित बहुजन आघाडीचेतहसीलदारांना निवेदनघोसरी : उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रहास उराडे यांच्यासह रवी तेलसे, श्यामकुमार गेडाम, अतुल वाकडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड रंजित खोब्रागडे, संदीप निमसरकार, रघुनाथ उराडे, शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे, जिल्हा प्रमुख आयटी सेल अविनाश वाळके, महेंद्र उराडे, सुनील दुर्गे, संतोष कवठे, मुन्ना घडसे, विजयकुमार दुर्गे, प्रकाश. एस .तावाडे आदी पदाधिकारी होते.