शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्य निवडीवरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:30 IST

येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे गणेश तर्वेकर यांची दहाविरुद्ध आठ अशी निवड करण्यात आली.

नागभीड न.प.च्या उपाध्यक्षपदी गणेश तर्वेकर : भाजप कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात तर काँग्रेसचा सीओंच्या कक्षात ठिय्यालोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे गणेश तर्वेकर यांची दहाविरुद्ध आठ अशी निवड करण्यात आली. मात्र स्वीकृत सदस्य निवडीवरुन निर्माण झालेला गोंधळ शनिवारी दिवसभर नागभीडकरांच्या चर्चेचा विषय ठरला. काँग्रेस नगरसेवकांची तक्रार करण्यासाठी भाजप नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला, तर नगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्यांची अवैध निवड केली, असा आरोप करून काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर ठिय्या ठोकून कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. येथील न.प.च्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची शनिवारी निवड करण्यात येणार होती. त्यानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे होते. विषयसूचीनुसार अगोदर उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. या पदासाठी भाजपकडून गणेश तर्वेकर तर काँग्रेसकडून संजय अमृतकर यांची नामांकने आल्याने भाजपच्या तर्वेकर यांनी काँग्रेसच्या अमृतकर यांचा १० विरुद्ध ८ अशा मतांनी पराभव केला.यानंतर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय समोर आला. यासाठी भाजपकडून नरेंद्र हेमणे व विलास श्रीरामे, तर काँग्रेसकडून प्रतीक भसीन यांची नावे निर्देशित करण्यात आली. नगराध्यक्ष प्रा. हिरे यांनी स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करताना हेमणे व श्रीरामे यांची नावे जाहीर केली. यावर काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेवून सभागृहात रोष व्यक्त केला. नियमानुसार एक सदस्य आमचा घ्या, अशी काँग्रेसची मागणी होती. यानंतर भाजपचे संपूर्ण नगरसेवक कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. काँग्रेस नगरसेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी त्यांची मागणी होती. पण वृत्त लिहिस्तोवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तर काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कक्षात जाऊन कागदपत्रांची मागणी केली. पण यावेळी त्यांनीही असमर्थता दर्शविली. त्यामुळे येथेही चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने नगराध्यक्षांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शनिवारी स्वीकृत सदस्य निवडीवरून पालिकेत रंगलेल्या राजकीय आखाड्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. आता सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून शहर विकासाची आशा नागभीडवासीयांना लागून आहे.