शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या पाण्यासाठी संघर्ष

By admin | Updated: March 28, 2016 00:47 IST

आसोलामेंढा तलावाच्या धर्तीवर घोडाझरी तलावातही गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ...

घोडाझरी संघर्ष समिती : ९ एप्रिलला ४० गावांत बंदनागभीड : आसोलामेंढा तलावाच्या धर्तीवर घोडाझरी तलावातही गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्थापन झालेल्या घोडाझरी संघर्ष समितीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील ४० गावांमध्ये ही समिती ९ एप्रिल रोजी बंद आंदोलन छेडणार आहे.१ नोव्हेंबर २०१५ रोजी घोडाझरी विकास परिषदेचे आयोजन करून या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर या समितीने क्षेत्रातील आमदार, खासदार, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्या प्रत्यक्षभेटी घेवून मागणीचे महत्त्व पटवून दिले. या मागणीचा सकारात्मक विचार नक्कीच करण्यात येईल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले. पण प्रत्यक्षात मात्र फलनिष्पत्ती काहीच होत नसल्याचे या समितीचे म्हणणे आहे.आसोला मेंढा तलावाच्या धर्तीवर गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडल्यास नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील सात हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. यासाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या घोडाझरी उपकालव्याच्या प्रस्तावित खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्च घोडाझरीत उपसा पद्धतीने पाणी सोडण्यावर येणार असेल तरी शासकीय अधिकारी मुद्दाम या उपसा पद्धतीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप समितीने केला आहे.घोडाझरी संघर्ष समितीने ही बाब वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना कथन केली असली तरी कोणताही अधिकारी वा पदाधिकारी यांना समितीच्या या मागणीकडे किंवा सूचनेकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही. नागभीड तालुक्यातील भातशेती पुर्णत: नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी या शेतीला बसत असला तरी दुसरा कोणताही उद्योग नसल्यामुळे या तालुक्यातील शेतकरी नाईलाजाने शेतीचा हा धंदा करीत आहेत. आता थोडी जागृती शेतकऱ्यांमध्ये व्हायला लागली असून घोडाझरी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी हा संघर्ष सुरू केला आहे. या संघर्षाचाच एक भाग म्हणून येत्या ९ एप्रिल रोजी लाभक्षेत्रातील संपूर्ण ४० गावातील शेतकऱ्यांनी आपआपल्या गावातील सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या एका बैठकीत घेतला. यात नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील गावांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)