शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, मनपाच्या आरोग्य केंद्रांची देखरेख याबाबत आमदार जोरगेवार यांनी सूचना दिल्या.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : आढावा बैठकीत मनपा आयुक्तांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणे ही चंद्रपुरातील मनपाची जबाबदारी असली तरी मागील काही वर्षांपासून पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दिशेने अमृत योजनेचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले. सोमवारी शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे व विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, मनपाच्या आरोग्य केंद्रांची देखरेख याबाबत आमदार जोरगेवार यांनी सूचना दिल्या. शहरात वाढीव वीज खांबांची व्यवस्था झाली की नाही, यावर चर्चा केली. नेताजी भवन सुरू करण्याबाबत काय अडचणी आहेत, मालमत्ता कर वाढीची कारणे आणि संडे मार्केट हटविल्याबाबतची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली. शिवाय रामाळा तलाव उद्यान स्वच्छता व खेळाचे साहित्य (बोट) तसेच विकासकामे करताना अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मनपा आयुक्तांना दिले. बाबूपेठमध्ये सुरू असलेल्या दोन पाण्याच्या टाकीचे काम जलद करा, असेही निर्देश दिले. मनपा आयुक्त यांनी काकडे यांनी ५२९ किलोमिटर नळाची नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असल्याची यावेळी माहिती दिली.बंगाली कॅम्पची शाळा पुन्हा सुरू होणार?बंगाली कॅम्प येथील मनपाची प्राथमिक शाळा बंद करून मनपाचे कार्यालय सुरू करण्यात आले. हे कार्यालय तातडीने बंद करून त्याच ठिकाणी मनपाची शाळा पूर्वरत सुरू करावी. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत लक्ष वेधले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका