१५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:43+5:30

जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ५५ हजार शेतकऱ्याची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली. सोमवारी दोन गावात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, पुष्पलता कुमरे व तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मोहिमेला सुरूवात झाली.

Complete farmers 156' certification of Aadhaar | १५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

१५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

Next
ठळक मुद्देशेतकरी कर्जमुक्ती योजना : राजुरा व साखरी येथील यादी तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील राजुरा शहर व सावली तालुक्यातील साखरी येथे सोमवारी आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन्ही गावात १५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ५५ हजार शेतकऱ्याची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली. सोमवारी दोन गावात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, पुष्पलता कुमरे व तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मोहिमेला सुरूवात झाली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानतंर्गत राजुरा साखरी गावांच्या आधारकार्ड प्रमाणीकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली. पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात योजनेस पात्र शेतकऱ्याची यादी सोमवारी लावण्यात आली.यादीतील लाभार्थी शेतकºयांनी मूळ आधारकार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर आदी कागदपत्रांसह आपले आधारसेवा केंद्रांमध्ये जाऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आपले आधार प्रमाणीकरण झाल्याची खात्री करायची होती. त्यापैकी सोमवारी दोन्ही बँका मिळून हे ४६ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सावली तालुक्यातील साखरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६७ तर अन्य बँकांचे ११ खातेधारक असे एकूण १७८ पैकी सोमवारी ११२ खातेधारकांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक खाडे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. साखरी येथे तहसीलदार पुष्पलता कुमरे, सहकार अधिकारी श्रेणी-१ सुषमा शिंदे, नायब तहसीलदार प्रवीण चिडे तर राजुºयात सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक खाडे, तहसीलदार डॉ. होळी, तालुका उपनिबंधक ए.आर. तुपट आदी सहभागी झाले होते.

बँक खात्यात होणार २ लाख जमा
शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकºयांचे आधारकार्ड प्रमाणित करण्यात आले. त्यांच्या बँक खात्यामध्ये २ लाख राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे. राजुरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४९ खातेधारक व अन्य बँकेचे ८७ खातेधारक असे एकूण १३६ खातेधारक आहेत.

Web Title: Complete farmers 156' certification of Aadhaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.