भाजपाचे घर चलो अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 01:43 IST2017-04-01T01:43:12+5:302017-04-01T01:43:12+5:30

६ एप्रिल या भाजपाच्या स्थापना दिनापासून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महानगरात भाजपातर्फे

Come home to BJP's campaign | भाजपाचे घर चलो अभियान

भाजपाचे घर चलो अभियान

बैठकीत मंथन : कार्यकर्त्यांची उपस्थिती
चंद्रपूर : ६ एप्रिल या भाजपाच्या स्थापना दिनापासून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महानगरात भाजपातर्फे ‘घर चलो’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करुन भाजपाची महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचा निर्धार विठ्ठल मंदिर वॉर्डात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
या अभियानाची सुरुवात विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ मधून ३० मार्चपासून झाली असून बाजार वॉर्ड मडळाचे अध्यक्ष रमेश भुते यांच्या पुढाकारातून व नेतृत्वात भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बैठकीचे आयोजन करुन व या बैठकीस उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून शक्तीचे प्रदर्शन या बैठकीतून घडविले. येत्या दोन दिवसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील भाजप उमेदवारांची पक्षनेतृत्वाकडून घोषणा होणार आहे, हेदेखील यावेळी सांगण्यात आले.
सदर बैठकीला रमेश भुते, धनंजय हुड, सूर्यकांत कुचनवार, अनिल खनके, राजेंद्र खांडेकर, राहुल बनकर, विनोद शेरकी, अरविंद चवरे, श्रीहरी बनकर, सचिन निंबाळकर, प्रविण गोवारदीपे, ललित मुल्लेवार, अनिल माळवे, विनोद काळे आदी उपस्थित होते. ६ एप्रिलपासून भाजपातर्फे घर चलो अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Come home to BJP's campaign