शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

बचत गटांमार्फत उद्योग विकासासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:41 IST

राज्य शासनाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरूवात करण्यात आली. योजनेअंतर्गत तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या १० बचत गटांची निवड होणार आहे.

ठळक मुद्देसुरेश प्रभू : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरूवात करण्यात आली. योजनेअंतर्गत तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या १० बचत गटांची निवड होणार आहे. बचत गटांना आर्थिक मदत देण्यात येणार असून महिलांनी उद्योग विकासासाठी पुढे यावे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. शनिवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना बोलत होते.मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल विकास राज्यमंत्री रणजित पाटील, संबंधित विभागाचे सचिव असिम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित होते. चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी ना. प्रभू यांच्याशी संवाद साधला. उद्योजकता निर्माण करण्यासाठी हिरकणी योजना १७ फेब्रुवारीपासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील सक्षम बचत गटांना केंद्र्र पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल, अशी ग्वाही ना. प्रभू यांनी दिली.महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे महापौर घोटेकर यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बचतगट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी ना. प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही घोटेकर यांनी केले. अधिकाºयांनी जिल्ह्यातील माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.