शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी पिकांबरोबरच ‘युवाग्राम’चा मेळ

By admin | Updated: October 11, 2015 02:13 IST

देशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल,

सोमनाथ प्रकल्प : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरी, युवकांना मिळाला रोजगारराजू गेडाम मूलदेशातील कृषीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवीन काही घेता येईल, यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन नवा अविष्कार घडविण्याचा प्रयत्न सोमनाथ प्रकल्पात सुरू असतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून सोमनाथ हे केवळ लोकसंख्येवर नव्हे तर दर्जा आणि नव्या प्रयोगांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आदर्श शेती करणारे गाव ठरले आहे. शेतीवर भाताचे पीक न घेता पर्यायी पिके घ्यावीत. जेणेकरुन इतरत्र जावून भाजीपाला घ्यावा लागणार नाही. ही बाब हेरून पर्यायी पिकांची कल्पना साकारण्यात आली. या पर्यायी पिकांबरोबरच मेळ साधला गेला बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी ‘युवाग्राम’ चा. यामुळे बेरोजगार युवकांना स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा नवा आत्मविश्वास ‘सोमनाथ’ मधून मिळाला.सोमनाथ येथे पाणी अडवून बंधारे बांधल्या गेल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली. यातून धान्य पिकाबरोबरच पर्यायी पिकांची लागवड केल्या गेली तर सोमनाथ येथे वास्तव्य करणाऱ्यांना भाजीपाला व इतर बाबीसाठी बाहेर जावे लागणार नाही, हे हेरुन भाजीपाला व इतर फळभाज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विविध पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. गरजेएवढा भाजीपाला प्रकल्पात ठेऊन शिल्लक भाजीपाला बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात येतो. यामुळे भाजीपाला उत्पादनासोबतच आर्थिक उत्पन्नातदेखील वाढ झाली. पर्यायी पिकांत गहू, हरबरा, तूर, हळद, उस तसेच इतर पिकाची लागवड केल्याने सोमनाथ हे सर्वसपन्न ठिकाण संबोधल्या जाऊ लागले. धानाचे उत्तम पीक, त्यानंतर पर्यायी पिकातून आलेले यश बघता, परिसरातील बेरोजगार युवकांना शेतीचा अभ्यास करुन आपआपल्या गावात अनुकरणातून शिकता यावे, यासाठी ‘युवाग्राम’ म्हणून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सन १९९५ पासून ‘युवाग्राम’ यातून परिसरातील दहावी, बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आजही केला जातो. सोमनाथ येथे विद्यार्थ्यांना जेवणाबरोबर राहण्याचीसुद्धा सोय केली जाते. सोमनाथमधील निरनिराळ्या कामांमध्ये सामावून घेण्यात येते. यात ही मुले शेती, डेअरी, इलेक्ट्रीशियन, फॅब्रिकेशन तसेच शेतीच्या उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीचे कामदेखील दिल्या जाते. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर इतरत्र मारुन आपला स्वत:चा व्यवसाय करण्यास ते सक्षम बनलेले असतात. शासन सर्वांनाच नोकरी देणे शक्य नसल्याने सोमनाथ येथे होत असलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला तर स्वत:च्या पायावर आत्मनिर्भर राहण्याचा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होताना दिसून येतो.सोमनाथ येथे पुरक व्यवसायाला जोड दिली आहे, ती पशुपालन, शेळीपालन व मत्स्यपालनाची. आजच्या स्थितीत पशुपालनावर दुग्ध उत्पादनाचा उच्चांक गाठला गेला आहे. शेळीपालन यशस्वी झाले असून शेळ्या व बोकडांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यात विशेष म्हणजे मत्स्यपालन प्रकल्प सोमनाथ येथे यशस्वी झाला असून लाखो रुपयांचे मासे विक्री केले जात आहेत. मत्स्यपालन संस्थानाच ते देत असल्याने वर्षभर मासे पकडून विक्रीसाठी दूरपर्यंत नेले जातात. सोमनाथ येथे विविध पिकांबरोबर व्यवसायाभिमुख शेळी, मत्स, पशु पालनावर भर दिल्याने हा व्यवसाय देखील येथे यशस्वी होऊ शकतो ही प्रेरणा इतरांना देता येऊ लागली आहे. याच बरोबरच १० व १२ च्या विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न येथे करण्यात येत आहे. बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत आहे.