शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता दूत म्हणून विद्यार्थी देणार स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: November 11, 2014 22:37 IST

राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले.

चंद्रपूर : राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. तरीही आजघडीला अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचे वातावरण आहे. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतला आहे. या अभियानातून गाव स्वच्छ होणार आहे. मात्र आजही जनजागृतीची कमी आहे. त्यामुळे आता शाळांतील विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून गावागावांत जनजागृती करणार आहे. राज्य शासनाने हा उपक्रम सुरु केला असून बालकदिनापासून विद्यार्थी स्वच्छतेसाठी सरसावणार आहे. अस्वच्छतेमुळे गाव तसेच शहरातील नागरिकांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. अनेक आजारांना समोर जावे लागत आहे. जर प्रत्येकांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली तर, भविष्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची गरजच पडणार नाही.विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटले तर ते कुटुंबीय, परिसर आणि गावालाही स्वच्छ करू शकतात. यासाठी शासनाने आता शाळांमधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम सुरु केली आहे. १४ नोव्हेंबरपासून विद्यार्थी तसेच शिक्षक स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देणार आहे. यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देणार येणार आहे. यासाठी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक शाळांतील विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करणार असून तीन ते चार कुटुंबांना भेटी देवून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा कानमंत्र आता गावागावात राबविला जात असून स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)असे राबविणार शाळांत उपक्रम४ नोव्हेंबर - स्वच्छता व आरोग्य विषयक शपथ, मुख्याध्यापक विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीला स्वच्छतेवर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर परिसर स्वच्छता, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळांची स्वच्छता. सुंदर वर्गखोली स्पर्धा घेऊन शाळेमध्ये उत्कृष्ट वर्ग म्हणून गौरविण्यात येणार आहे. इमारत व परिसर स्वच्छतेवर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.१५ नोव्हेंबर- आरोग्य केंद्राला भेट, संतुलित आहार व आरोग्याची काळजी यावर माहिती, जेवनापूर्वी, शौचालयास जाऊन आल्यानंतर हाताची स्वच्छता कशी करावी यावर मार्गदर्शन१७ नोव्हेंबर- स्वत:ची स्वच्छता, स्वत:च्या खोली, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. माता-पालक मेळाव्यांचे केंद्र पातळीवर आयोजन, माता-पालक मेळावा, किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबरला स्वच्छ पाणी, सुरक्षित हाताळणी, निर्जंतुकीरण आदींवर मार्गदर्शन, पाणी शुद्धीकरण केंद्राला भेट, एवढेच नाही तर बालकांकडून पाणी बचत, स्वच्छ पाणी यासारख्या घटकांवर स्टीकर लावण्याबाबत सांगण्यात येणार आहे. अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग याबाबत माहिती देऊन ते