लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. जिल्ह्यात ८७केंद्रांवर बारावीचे २८ हजार ३०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून केंद्रावर निगराणीत ठेवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी टीम तयार करण्यात येणार आहे. बैठे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार आहे.
परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह संस्थाचालकांचे अधिकच टेन्शन वाढले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रसंचालक तर पर्यवेक्षक, लिपिक शिपाई यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. भरारी पथकात वर्ग एक, वर्ग दोनचे अधिकारी तसेच महिला प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकही घेतली.
असे आहे परीक्षा केंद्रतालुका केंद्र विद्यार्थीचंद्रपूर १९ ७३९६बल्लारपूर ६ १२७५भद्रावती ४ ११५७ब्रह्मपुरी ५ २२४०चिमूर ६ १७३२गोंडपिपरी ५ १११९कोरपना ६ १५५१मूल ४ १६३१नागभीड ५ १६४५पोंभूर्णा १ ४४०राजुरा ८ २०९०सावली ४ १३१९सिंदवाही ३ ११३८वरोरा ७ २३६३जिवती ४ १२०७एकूण ८७७ २८३०३
"विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे विभागाचे संपूर्ण लक्ष आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहे."- राजेश पातळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक