धोकादायक शौचालयाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:08+5:302021-06-17T04:20:08+5:30

बल्लारपूर : हनुमाननगर वॉर्डातील नाल्याच्या काठावर नगर परिषदेने बनविलेले शौचालय मागील एक वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे; परंतु नगर परिषदेने ...

City council ignores dangerous toilets | धोकादायक शौचालयाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष

धोकादायक शौचालयाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष

बल्लारपूर : हनुमाननगर वॉर्डातील नाल्याच्या काठावर नगर परिषदेने बनविलेले शौचालय मागील एक वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे; परंतु नगर परिषदेने शौचलयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शौचालयात जाणाऱ्यास धोका होऊ शकतो. त्यापूर्वीच नगर परिषदेने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी हनुमान वॉर्डातील लोकांची मागणी आहे.

सामाजिक कार्यकर्ता सुशील कुमार यांनी सांगितले की, एकीकडे नगर परिषद म्हणते, नाल्यावर बांधकाम करायचे नाही आणि नगर परिषदेने या शौचालयाचे बांधकाम नाल्यावर केले आहे. असे असून शौचालयाचा खालचा भाग पावसाच्या पाण्यामुळे खचला आहे. तरीसुद्धा या बाबीकडे नगर परिषदेच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. मागील चार दिवसांपासून शहरात पाऊस पडत असून धोका होण्याच्या आधी या शौचालयाचा प्रश्न नगर परिषदेने मार्गी लावावा, अशी वाॅर्डातील जनतेची मागणी आहे.

Web Title: City council ignores dangerous toilets