शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

विकेंड लाॅकडाऊनला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यात रुग्णसंख्या ३३ हजार ५२९ वर पोहचली आहे. वाढता प्रादूर्भाव बघता राज्य सरकारने विकेंट लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण करून अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने यासाठी संयुक्तप्रयत्न सुरु केले. त्यातच काहीजण सोडता नागरिकांनी मनावर घेत घरातच राहणे पसंत केले आहे.

ठळक मुद्देरस्त्यांवर शुकशुकाट : लाॅकडाऊन करा जनमानसांत सूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रेक द चेन अंतर्गत विकेड लाॅकडाऊन करण्यात आला. शनिवारनंतर रविवारीही चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त होता. रुग्णसंख्या बघता मरण्यापेक्षा लाॅकडाऊन करा, अशी जनसामान्यांची भावना आजच्या विकेंड लाॅकडाऊनवरून बघायला मिळाली. दरम्यान, तालुकास्तरावरही हा विकेंड लाॅकडाऊन यशस्वी झाला. मात्र कोरोना रुग्णसंख्या थोपविण्यास कुठपर्यंत यश येते ही येणारी वेळच सांगणार आहे.जिल्ह्यात रुग्णसंख्या ३३ हजार ५२९ वर पोहचली आहे. वाढता प्रादूर्भाव बघता राज्य सरकारने विकेंट लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण करून अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने यासाठी संयुक्तप्रयत्न सुरु केले. त्यातच काहीजण सोडता नागरिकांनी मनावर घेत घरातच राहणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे, काही व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला होता. मात्र रविवारी अत्यावश्यक सेवेंचे दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठेसह गल्लोगल्लीतील सर्वच व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत कोरोना महामारीला रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. दरम्यान, महामंडळाच्या दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. तर मालवाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. 

सकाळपासून पोलीस बंदोबस्तरविवारी सकाळपासून पोलिसांनी सर्वच चौकात बंदोबस्त वाढविला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकांना हटकले जात होते. कारण नसताना फिरणाऱ्याला घरी पाठविले जात होते. येथील रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव हे आपल्या ताफ्यासह रविवारी सकाळीच वडगाव चौकात उभे राहून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. तर चंद्रपूर शहर पोलिसांनीही चौकात बंदोबस्त ठेवला होता.

मालवाहतूक सुरुरविवार असल्यामुळे शहरातील बाजारपेठ तशीही बंदच असते. त्यातच कोरोना संकटामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी घराबाहेर न निघनेच पसंत केले. विकेंट लाॅकडाऊनमध्ये वाहतूक करण्यावर निर्बंध नसल्यामुळे मालवाहतूक सुरु होती. मात्र याकडे पथक लक्ष ठेवून होते.

भाजी, दुध विक्रेते आलेच नाहीचंद्रपूर शहराजवळील काही गावातील शेतकऱ्यांसह काही नागरिक भाजीपाला, दूध विक्री करून उदरनिर्वाह करतात. मात्र शनिवार तसेच रविवारी त्यांनी नुकसान सहन करीत कोरोना संकटाला थोपविण्यासाठी येण्याचे टाळले.

चार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईघुग्घुस : येथे कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या जय अंबे हार्डवेअर, प्रेमाचा चहा, गुजरी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांवर करवाई करीत घुग्घुस न.प. प्रशासनाच्या पथकाने दंड ठोठावला आहे. शहरात न.प प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सकाळपासून बाजारपेठेची पाहणी सुरु केली असता घुग्घुस-चंद्रपूर मार्गांवरील जय अंबे हार्डवेअर, प्रेमाचा चहा, गुजरी बाजारातील दोन भाजीपाला विक्रेते कोविड नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. न.प. प्रशासनाने जय अंबे हार्डवेअरला पाच हजार रुपये, प्रेमाचा चहाला ५०० रुपये, दोन भाजीपाला विक्रेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला व दुकाने बंद ठेवण्याची ताकीद दिली.कोरोना खबरदारीकरिता घुग्घुस न.प. प्रशासनाने ६ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत घुग्घुस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या