शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीचे नागरिक वाघांच्या दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहे.

ठळक मुद्देआयुधनिर्माणी परिसरात वाघांचे दर्शन : शिकारीसाठी वन्यप्राण्यांची शहराकडे धाव

सचिन सरपटवार / विनायक येसेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती वनपरिक्षेत्र ताडोबा-अंधारी अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रालगत असल्याने वन्यप्राण्यांचा शहर परिसरात नेहमीच शिरकाव असतो. मागील काही दिवसांमध्ये वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळच्या सुमारास आयुध निर्माणी परिसरातील तीन बछड्यांसह वाघाचे दर्शन झाल्याचे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहे.मल्हारीबाबा सोसायटी, गौतमनगर येथे जवळपास तीन ते चार बिबट्यांचा वावर असून तेथील नागरिकांनी बिबट्यांना दर्शन दिले. कधी संरक्षण भिंत तर कधी मुख्य महामार्गावरील पुलाच्याखाली अगदी वस्तीत या वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान, तीन बछड्यांसह पट्टेदार वाघ दिसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर मैदानाच्या बाजुला असलेल्या तळ्याच्या पारीवरही हे वाघ मस्ती करतानाही काहींनी बधितले.बंद कोळसा खाण परिसरात वाघांचे वास्तवतालुक्यातील कर्नाटक एम्टा, डागा माइंस, तेलवासा ,ढोरवासा, चारगाव येथील कोळशाच्या खाणी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. त्यामुळे या क्षेत्रात अन्य वन्यप्राण्यांनी मोठ्या संख्येने आहे. शिकार मिळत असल्याने वाघांचेही या ठिकाणी बस्तान आहे. येथील वाघांनी ताडोबा, डिफेन्स , जेना पहाडी, सिरणा नदी ते तेलवासा - ढोरवासा, यवतमाळ जिल्ह्यातील उकनी असा नवीन ग्रीन कॉरिडोर तयार केला असल्याने वाघांच्या रक्षणासाठी व मानवांच्या बचावासाठी या भागात वनविभागाने सूचना फलक सुद्धा लावला आहे.वाघाच्या हल्यात गाय जखमीपट्टेदार वाघाच्या हल्यात गाय जखमी झाल्याची घटना आयुध निर्माणी परिसरात शनिवारी रात्री ११.१५ सेक्टर ५, टाईप ४ येथे घडली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वाघाने एका गाईवर हल्ला केला. गाय नालीत पडली. आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी जावून जखमी गायीचे प्राण वाचविले, असे प्रत्यक्षदर्शी संजय टिकले तथा नगरसेविका सुनिता टिकले यांनी सांगितले. अर्धवट शिकार झाली असेल तर त्या ठिकाणी वाघ पुन्हा येतो. याही ठिकाणी तेच घडले. रात्री १ च्या सुमारास तो वाघ त्याच ठिकाणावर आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.पट्टेदार वाघाच्या हल्यात गाय जखमी झाल्याची घटना आयुध निर्माणी परिसरात शनिवारी रात्री ११.१५ सेक्टर ५, टाईप ४ येथे घडली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वाघाने एका गाईवर हल्ला केला. गाय नालीत पडली. आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी जावून जखमी गायीचे प्राण वाचविले, असे प्रत्यक्षदर्शी संजय टिकले तथा नगरसेविका सुनिता टिकले यांनी सांगितले. अर्धवट शिकार झाली असेल तर त्या ठिकाणी वाघ पुन्हा येतो. याही ठिकाणी तेच घडले. रात्री १ च्या सुमारास तो वाघ त्याच ठिकाणावर आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :forestजंगल