शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्यातील दहा गावात नागरिकांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

प्रकाश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात ...

ठळक मुद्देगो कोरोना : गावात याल तर खबरदार; बाहेरील व्यक्तींना तंबी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. १४ एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी गावातील मुख्य रस्ताच सील करून गावबंदी केली आहे.राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या, जिल्ह्याच्या तसेच आता गावाच्या सीमा नागरिकांनी सील केल्या आहेत. राजुरा तालुक्यातील पाचगाव, भेंडवी, चंदनवाही, मंगी, पांढरपौनी, कळमना, सोनापूर, सालेगुडा, रेंगेगुडा, गोपालपूर या गावातील गावकऱ्यांनी मुख्य रस्त्या पूर्णत: बंद केल्याने बाहेरील व्यक्ती येऊ शकत नाही. चुकून बाहेरील व्यक्ती गावात आला तर त्याला दुरूनच विचारपूस करून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना विचारून योग्य चौकशी करूनच प्रवेश दिला जातो. यासाठी गावातील युवक दुरूनच बाहेरून आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेऊन असतात. नागरिकांनी गावबंदी केल्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत झाली आहे. मौजा पाचगाव येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पाचगावच्या वतीने तहसीलदार रवींद्र होळी यांची परवानगी घेऊन गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले.प्रत्येक दुकानदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाने आदेश पत्र देऊन दुकानातून खर्रा, गुटखा व कोल्ड्रिंक विकू नये, जर कोणी विकताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद करण्यात आले.तसेच गावातील मुख्य चौकामध्ये कुणीही गर्दीने बसू नये, कलम १४४ नुसार संचारबंदी लागू आहे. या कायद्याचे पालन नागरिकांनी करावे, असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहे.या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकही कोरोनासारख्या महाभयानक रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून राजुरा तालुक्यातील गावागावात बाहेरील व्यक्तीसाठी गावबंदी करण्यात आली आहे.सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीसावरगाव : संपूर्ण भारत देशात कोविड -१९ चा वाढता प्रकोप बघता आणि कुणालाही कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये. यासाठी खबरदारी म्हणून नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरातील अनेक गावात प्रवेश बंदीचे आवाहन करण्यात आले. कोविड -१९ कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला मृत्यूच्या कवेत कवटाळले असताना आता भारतातही या विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याची पूर्व खबरदारी म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा २४ मार्चच्या रात्रीला केली. आणि तसे आदेश सोडले. दरम्यान सर्वांना घरी राहण्याबाबत सक्ती केली जात आहे. विविध माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने सावरगाव परिसरातील कन्हाळगाव (सोनुली), सावरला आदी गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत