शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील आझाद बगिचा टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 01:35 IST

चंद्रपूरच्या ह्दयस्थळी असलेल्या आझाद बागेची मागील अनेक महिन्यांपासून दूरवस्था झाली आहे.

सौंदर्यीकरण : देखभाल, दुरुस्तीचे देणार कंत्राटचंद्रपूर : चंद्रपूरच्या ह्दयस्थळी असलेल्या आझाद बागेची मागील अनेक महिन्यांपासून दूरवस्था झाली आहे. मात्र आता या बागेचे सौंदर्यीकरण करून बालगोपालांसाठी खेळणेही लावण्यात येणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली असून तशा निविदाही काढल्याची माहिती आहे.येथील महात्मा गांधी मार्गावर अगदी शहराच्या ह्दयस्थळी हा आझाद बगिचा आहे. या बगिचात दररोज हजारो नागरिक येतात. पहाटेपासूनच नागरिकांची या बागेत वर्दळ सुरू होते. सायंकाळीही नागरिक मोकळ्या हवेत फिरायला या बागेत येतात. विशेष म्हणजे, वयोवृध्द व बालगोपालही या बागेत येतात. त्यामुळे मुलांसाठी बागे काही वर्षांपूर्वी विविध खेळणे लावण्यात आले होते. आता हे खेळणे तुटले आहेत. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने आझाद बागेच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. काही वर्षे कंत्राटदारांमार्फतच या बागेची देखभाल केली गेली. त्यावेळी या कंत्राटी कंपनीने विविध आधुनिक खेळणे बागेत लावले होते. मात्र पुढे हे कंत्राट रद्द झाले. तेव्हापासून मनपा प्रशासनच या बागेची देखभाल करीत आहे. शहराच्या ह्दयस्थानी ही बाग असल्यामुळे या बागेचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. आता महानगरपालिकेनेही या बागेचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)आझाद बागेच्या देखभाल दुरुस्तीसाठी यापूर्वी निविदा मागविल्या होत्या. मात्र अद्याप एकही निविदा आलेली नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या आहेत. बागेचे सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे.-संतोष लहामगे, सभापती, स्थायी समिती, मनपा चंद्रपूर.